*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

जागतिक हिमोफिलीया दिन. 15 एप्रिल.





हिमोफिलीया हा एक आनुवंशिक ट्रान्समिटेड विकार आहे.ज्या विकारामध्ये त्या रुग्णांचे शरीर त्याच्या रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारे घटक निर्माण करु शकत नाही.ज्याचे त्या रुग्णाला भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात व हे हानिकारक असू शकते.हिमोफिलीक रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात.मात्र त्यांना यासाठी काही गोष्टींबाबत दक्षता घ्यावी लागते.

यासाठी जाणून घेऊयात Hemophiliac रुग्णांनी कोणत्या ५ गोष्टीबाबत खबरदारी घ्यायला हवी.
NSAIDs घेणे टाळणे-
नॉन स्टेरॉइडल अॅन्टी इन्फ्लैमटरी ड्रग्ज (NSAIDs) औषधांमुळे रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट मधील चिकटपणा कमी होतो व रक्त पातळ होते.तसेच या औषधांमुळे हा रक्ताचा विकार अधिक गंभीर देखील होऊ शकतो.वर्ल्ड फेडरेशन फॉर हिमोफिलीया नूसार Aspirin, Clopidogrel, Dexibrufen व Diclofenac ही औषधे अशा रुग्णांनी घेऊ नयेत.त्यांच्यासाठी या औषधांना Paracetamol हा एक चांगला पर्याय असू शकतो.

सांध्याची काळजी घ्या-
हिमोफिलीक रुग्णांना जसा बाहेरुन रक्तस्त्राव होऊ शकतो तसाच गुडघा,घोटा व कोपरामध्ये दुखापत होऊन शरीरामध्ये देखील रक्तस्त्राव होऊ शकतो.जर या भागांमध्ये सातत्याने रक्तस्त्राव झाला तर या भागातील कार्टीलेज व सांध्यांमध्ये बिघाड होऊ शकतो.ज्यामुळे त्या रुग्णांना गंभीर आर्थ्राटीस व अपंगत्व येऊ शकते.तसेच यामध्ये जांघेचा सांधा देखील दुखावला जाऊ शकतो.या अवयवांची काळजी घेण्यासाठी दररोज व्यायाम करा व नियमित हेल्थ चेक-अप करुन घ्या ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ सुरक्षित आयुष्य जगाल.

व्यायाम करणे टाळू नका-
काही जणांना असे वाटू शकते की हिमोफिलीक रुग्णांनी व्यायाम करणे अथवा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणे हानिकारक असू शकते.पण हे मुळीच खरे नाही.योग्य काळजी घेत कोणताही व्यायाम केल्यास या रुग्णांना त्याचा फायदाच होऊ शकतो.कारण व्यायाममुळे स्नायु मजबूत होतात व त्यांच्यामधील आकुंचन व को-ऑर्डिनेशन सुधारते.मात्र हिमोफिलीक रुग्णांनी कोणतीही अॅक्टिव्हिटी निवडताना विशेष काळजी घ्यावी.स्विमींग,सायकलींग,वॉकींग आणि बॅटमिंटन सारखे खेळ खेळणे त्यांच्यासाठी सुरक्षित व हेल्थी असू शकते.मात्र त्यांनी फुटबॉल व बॉक्सिंग सारखे कॉन्टॅक्ट स्पोटर्स खेळणे टाळावे.

तुमचे ओळखपत्र सतत जवळ ठेवा-
अशा रुग्णांनी त्यांना हिमोफिलीया विकार असे नमुद केलेले ओळखपत्र सतत जवळ ठेवावे.ज्यामध्ये त्यांची आरोग्य समस्या,घेत असलेले उपचार,त्यांची औषधे व त्यांना असलेल्या अॅलर्जींची नोंद असणे गरजेचे आहे.ज्यामुळे एखादी इमरजन्सी आल्यास डॉक्टरांना त्यांच्यावर योग्य उपचार करणे शक्य होईल.

प्रवास करताना काळजी घ्या-
हिमोफिलीक रुग्णांनी प्रवास करण्यापूर्वी त्यांची सर्व औषधे घेतली आहेत याची खात्री करुन घ्यावी.तसेच कोणती औषधे कधी घ्यावीत व इमरजन्सीमध्ये काय उपचार करावेत याची नोंदवही देखील सोबत ठेवावी.ते ज्या विभागामध्ये प्रवास करणार आहेत त्या विभागात असलेल्या हिमोफिलीया क्लिनीकची माहिती देखील वाचून अथवा नोंद करुन ठेवावी.तसेच त्यांनी हे देखील पहावे की ते ज्या देशात प्रवास करणार आहेत तिथे ते घेत असलेली औषधांसाठी परवानगी आहे का? ज्यामुळे त्यांना किती प्रमाणात औषधे सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे व कोणती कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे याची माहिती मिळू शकेल.

No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट