*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

भारताने विकसित केले नवजात श्रवण स्क्रीनिंग उपकरण “SOHUM”

भारतात विकसित केलेल्या नवजात श्रवण स्क्रीनिंग उपकरण “SOHUM” (सोहम) चे नवी दिल्लीत अनावरण करण्यात आले. स्कूल ऑफ इंटरनॅशनल बायोडिजाइन (SIB) चे स्टार्टअप “Sohum Innovation Labs India Private Limited” ने SOHUM विकसित केले आहे. हे अभिनव वैद्यकीय उपकरण विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने SIB कडून विकसित केले गेले आहे. 

SOHUM हे एक स्वस्त असे विशेष उपकरण आहे, जे मेंदूच्या मज्जातंतूंची श्रवण क्षमतेच्या जागृत झालेल्या प्रतिसादासाठी उपयोगात आणले जाते आणि नवजात बालकाच्या ऐकण्याच्या प्रक्रियेची तपासणी करण्याकरिता श्रवणशक्ती तपासणीचे उत्कृष्ट मानक आहे.

SOHUM ची कार्यपद्धती :-
बालकांच्या डोक्यावर श्रवण स्क्रीनिंग यंत्राचे तीन इलेक्ट्रोड लावले जातात, जे ऐकताना मेंदूच्या संवेदना मापतात. श्रवणशक्तीमुळे बालकाला ऐकू येत असल्यास हे इलेक्‍ट्रोड मेंदूत उत्पन्न झालेल्या विद्युत प्रतिक्रियांचा तपास करते. ज्यामुळे त्याला ऐकू येत नाही किंवा आहे ते समजते. जर कोणतीही विद्युत प्रतिक्रिया मिळाली नाही तर ते मूलं बहिरा असल्याचे समजते. हे उपकरण बॅटरी संचालित व धोकादायक नाही. यामध्ये इन-बिल्‍ट एल्गोरिथम तयार करण्यात आले आहे, जे मिळणार्‍या संकेतांना बाहेरच्या आवाजापासून वेगळे करतो.
SIB बाबत :-
SIB हा जैवतंत्रज्ञान विभागाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याचे लक्ष्य भारताची अपूर्ण वैद्यकीय गरजांच्या अनुसार अभिनव व स्वस्त वैद्यकीय उपकरणांना विकसित करणे आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) आणि IIT दिल्ली हे संयुक्त रूपाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहेत. बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेड हे या कार्यक्रमाच्या तांत्रिकी-कायदेशीर कारवाईचे व्यवस्थापन करीत आहेत.
SOHUM चा फायदा :-
बहिरेपणा घेऊन जन्मलेल्या बालकांच्या अपंगत्वाचे लक्षण वयाचे चार वर्ष पूर्ण केल्यानंतर दिसून येतात. यामुळे त्यांच्या विकासामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. या उपकरणामुळे लवकरात लवकर या समस्येचे निदान होऊन त्यांच्या पुढील मदतीसाठी कार्य करणे सोपे होऊ शकणार आहे.

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट