*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

भारतीय दृष्टिहीन संघाने पटकावला टी-20 विश्वचषक 2017

दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतवेळच्या विजेत्या भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टी-२०विश्वचषकावर नाव कोरलं आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने विजेतेपद राखले.

प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने 197/9 धावांचा डोंगर उभा केला होता. 198 धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या दहा षटकात बिनबाद 109 धावांकरत कडवे आव्हान दिले. अजय कुमार रेड्डी आणि प्रकाश जयरामय्या या सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. अजय रेड्डी 43 धावा काढून धावबाद झाला. मात्र तोपर्यंत भारतीय संघ विजयासमीप आला होता. संघाच्या 163 धावा झाल्या असताना रेड्डी माघारी परतला. पाकिस्तानने दिलेले 198 धावांचे आव्हान भारताने 18 व्या षटकात पार करत पाक संघाचा 9 विकेटने दारूण पराभव केला.


शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेवर दहा विकेट्स राखून मात करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर शनिवारच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचं आव्हान मोडून काढत भारतासमोर कडवं आव्हान उभे केलं होते. साखळी फेरीत एकही सामना न हरता पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती. साखळी सामन्यात पाक संघाने भारतावर विजय मिळवला होता. त्याचा वचपा काढत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे.

No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट